♦कृतिशील शिक्षक महाराष्ट्र (ATM)♦
🌼मजेशीर गणिती क्लुप्ती🌼
मित्रानो वर्ग संख्या विद्यार्थ्याकडून पाठ करुण घेणे मोठे जिकिरिचे काम असते। जरी वर्ग संख्या पाठ करुण घेतल्या तरी परीक्षेत ऐनवेळी गोंधळ उडू शकतो।
शिष्यवृत्ति परीक्षेत अशा प्रकारचा प्रश्न असतो।
हा प्रश्न सोडवताना मुले आधी दोन्ही संख्येचे वर्ग काढतात आणि नंतर त्याची वजाबाकी करतात। यात त्यांचा खुप वेळ वाया जातो।
हा प्रश्न खालील पद्धतीने चटकन सोडवता येतो।
🔶 सर्वात प्रथम ज्या दोन संख्या सांगितल्या त्याची बेरीज करा।
🔶 त्याच दोन संख्येची वजाबाकी करा।
🔶शेवटी त्या बेरीज आणि आलेल्या वजाबाकिचा गुणाकार करा।
🔶 आलेले उत्तर त्या दोन संख्येच्या वर्ग संख्येतील फरक असेल।
🔶 उदा: ३७ - २२ = १५
३७ + २२= ५९
शेवटी
१५ × ५९ = ८८५
फरक हा ८८५ असेल।
सदर उत्तर हे a2-b2= (a+b)(a-b) यावर आधारित
३७ चा वर्ग १३६९
२२ चा वर्ग ४८४
यातील फरक १३६९ - ४८४= ८८५
वरील पद्धतीने तुम्ही कितीही मोठ्या वर्ग संख्येतिल फरक सहज काढू शकता।
धन्यवाद.....
उमेश कोटलवार
लांजा जि. रत्नागिरी
पटल तर नक्की ▶▶▶▶▶
www.hasatkhelatshikshan.in
Very nice sir
ردحذفछान
حذفthanks
ردحذفRama atul mane
ردحذف