आंतरजिल्हा बदली बाबत महत्वाचे पत्र

आंतरजिल्हा बदली बाबत महत्वाचे पत्र



दिनांक: १३ सप्टेंबर, २०२३

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

विषय :- सन २०२२ मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत वेळापत्रक

संदर्भ :- (१) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४ दि.०७/०४/२०२१

(२) शासन निर्णय, ग्रामविकास विभाग क्र. आंजिन-२०२३/प्र.क्र.११७/आस्था-१४, दि.२३/०५/२०२३

(३) शासन निर्णय, शालेय शिक्षण विभाग क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/टीएनटी-१, दि.२१/०६/२०२३

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्याबाबतचे सुधारित धोरण संदर्भाधीन दि.०७/०४/२०२१ व दि. २३/०५/२०२३ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहे. सदर धोरणातील तरतूदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या सन २०२२ मधील बदल्या संगणक प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या आहेत.

२. आता शालेय शिक्षण विभागाने संदर्भाधीन दि. २१/०६/२०२३ च्या शासन निर्णयान्वये, सन-२०२२ मधील विनंती केलेल्या ज्या शिक्षकांना बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांचे विनंती अर्ज प्रतिक्षाधीन ठेवून जशी पदे रिक्त होतील त्याप्रमाणे रिक्त पदी बदली देण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निदेश आहेत. त्यानुषंगाने सन-२०२२ मध्ये आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांनी अर्ज केले होते, परंतु आंतरजिल्हा बदलीप्रक्रीया राबवत असतांना जे शिक्षक आंतरजिल्हा बदली मिळण्यासाठी पात्र ठरले होते. मात्र, रिक्त जागा अभावी ज्यांना बदली मिळाली नव्हती. फक्त अशाच सन-२०२२ च्या बदलीप्रक्रीयेमधील प्रतिक्षाधीन प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदल्यांबाबतची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. सदर बदली प्रक्रियेकरीता E.O. लॉगीन मध्यरात्री पासून सुरु करण्यात येणार असून मंजूर केलेली बिंदुनामावली अपलोड करण्याबाबतची कार्यवाही सर्व जिल्हा परिषदा यांनी दि.१४/०९/२०२३ ते दि.१७/०९/२०२३ या कालावधीमध्ये पूर्ण करावी.

आपला,

(पो.दे. देशमुख) उप सचिव, 

महाराष्ट्र शासन

प्रत, माहिती तथा आवश्यक कार्यवाहीस्तव सादर.

१) विभागीय आयुक्त, विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व) 

२) उपायुक्त (आस्थापना), विभागीय आयुक्त कार्यालये (सर्व विभाग)

३) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व)

४) माहिती व जनसंपर्क संचालनालय यांना प्रसिध्दीसाठी अग्रेषित. 4) Vinsys IT Services (1) Pvt. Ltd. Shivaji Niketan. Teias Society. Kotharud,

निवडनस्ती कार्यासन आस्था, १४, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم