इयत्ता - सहावी विषय - मराठी ऑनलाईन टेस्ट क्र. 1 बलसागर भारत होवो | Balsagar Bharat Hovo| iyatt sahavi Marathi

     इयत्ता - सहावी

विषय - मराठी

ऑनलाईन टेस्ट क्र. 1

बलसागर भारत होवो

(Balsagar Bharat Hovo)

पराक्रम, ऐक्य, सेवा,  त्याग आणि देशभक्ती यांच्यामधून आपला भारत देश अधिक शक्तिशाली व्हावा अशी अपेक्षा साने गुरुजींनी 'बलसागर भारत होवो'  या समूहगीतात व्यक्त केली आहे.

कवियत्री साने गुरुजी लिखित ही कविता आहे. याकवितेत साने गुरुजी काय म्हणतात हे आपण जाणून घेऊयात.

आपला भारत देश हा शक्तिशाली हवा व सर्व जगात त्याची ख्याती पसरावी यासाठी जनसेवेचे व्रत मी हाती घेतले आहे. आपल्या भारत देशासाठी मी माझे प्राण द्यायला देखील तयार आहे.

माझ्या देशाला वैभव मिळवून देण्यासाठी मी माझे सर्वस्व अर्पण करणार आहे त्यासाठी भेदभाव, अराजकता अशा गोष्टींचा अंधार दूर करावा लागणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व बांधव मला मदत करायला या.

भारताच्या वैभवशाली वैभवा साठी आपण सगळे एकत्र येऊन हातात हात घेऊन मनात ऐक्‍याचा एकजुटीचा मंत्र म्हणत आपण हे कार्य करायला तयार होऊ या.

हाती दिव्य पताका घेऊन आपण प्रिय भारत विषयाची गीते गाऊया आपल्या भारताचा पराक्रम संपूर्ण जगात दाखवूया.

चला यासाठी आपण आपल्या पराक्रमाची शर्थ करूया. त्यासाठी आपण शक्य ते सगळे प्रयत्न करूया असे जर केले नाही तर आपले जीवन व्यर्थ जाईल त्यामुळे भारताचे भाग्य असेच उजळुन निघो.

या सर्वांमुळे भारताचे नाव जगात मोठे होईल, त्याचे वैभव वाढेल जगाला शांती देणारा भारत हा महान देश होईल व हा सोन्याचा दिवस लवकरात लवकर उदयाला येवो असे कवी साने गुरुजी याठिकाणी आपली इच्छा या कवितेतून प्रकट करत आहेत.

ऑनलाईन टेस्ट क्र. २ - सायकल म्हणते,मी आहे ना ! (टेस्ट सोडवण्यासाठी क्लिक करा.)

आपण ही टेस्ट सोडवून आपल्याला हा घटक कितपत समजला हे जाणून घेऊयात.







Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم