बघा तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ? | How many sim card on my Aadhar Number?

 



बघा तुमच्या नावावर किती सिम कार्ड रजिस्टर आहेत ? 

 How many sim card on my Aadhar Number?


आपल्या ओळखपत्राचा अनधिकृत वापर करून सिमकार्डचा गैरवापर झाल्याच्या घटना आपण ऐकत असतो.दूरसंचार विभागामार्फत (Tafcop) हे पोर्टल तयार करण्यात आले आहे.त्यासाठी विभागाने एक संकेतस्थळ चालू केले आहे. याठिकाणी देशभरातील सद्यस्थितीत चालू मोबाईल क्रमांकाचा डेटाबेस तयार करून या वेबसाईटवर अपलोड केलेला आहे.याचा मुख्य उद्देश हा न कळत होणारी ग्राहकांची फसवणूक रोखणे हा आहे. जर एखादा नंबर आपल्या नकळत कोणी वापरत असेल तर त्याची तक्रार देखील आपण याठिकाणी करू शकता.आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर आहेत हे आपणास याठिकाणी दिसून येईल.


फसवणूक व्यवस्थापन आणि ग्राहक संरक्षण (TAF-COP) पोर्टलसाठी दूरसंचार विश्लेषण


 दूरसंचार विभाग (DoT) ने दूरसंचार सेवा प्रदात्यांद्वारे (TSPs) ग्राहकांना दूरसंचार संसाधनांचे योग्य वाटप सुनिश्चित करण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी त्यांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत.  विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांनुसार, वैयक्तिक मोबाइल ग्राहक त्यांच्या नावावर नऊ मोबाइल कनेक्शनची नोंदणी करू शकतात.


 ही वेबसाइट सदस्यांना मदत करण्यासाठी, त्यांच्या नावावर कार्यरत असलेल्या मोबाइल कनेक्शनची संख्या तपासण्यासाठी आणि त्यांचे अतिरिक्त मोबाइल कनेक्शन असल्यास नियमित करण्यासाठी आवश्यक कारवाई करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे.  तथापि, ग्राहक संपादन फॉर्म (CAF) हाताळण्याची प्राथमिक जबाबदारी सेवा प्रदात्यांची आहे.


 या पोर्टलमध्ये दिलेल्या सुविधा खालीलप्रमाणे आहेत.


 ★ ज्या सदस्यांच्या नावावर नऊ पेक्षा जास्त एकाधिक कनेक्शन आहेत त्यांना एसएमएसद्वारे सूचित केले जाईल.


★ ज्या सदस्यांच्या नावावर नऊ पेक्षा जास्त एकाधिक कनेक्शन आहेत ते - आवश्यक कारवाई करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात.


 ★ आपले स्टेटस तपासा तुमच्या नंबरने लॉग इन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि "रिक्वेस्ट स्टेटस" बॉक्समध्ये "तिकीट आयडी रेफरन्स नंबर" टाका.


आपणास हे जाणून घ्यायचे असेल तर खालील पद्धतीने आपण जाणून घेऊ शकता .

१)सर्वप्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/या वेब साईटवर जा.

२) त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाका.

३) आपल्या मोबाईलवर otp येईल तो याठिकाणी टाका.

४)आता लॉग इन होऊन आपल्या नावावर किती सिम कार्ड सुरू आहेत याची लिस्ट आलेली दिसेल.

५)जर त्या लिस्टमध्ये आपण वापरत नसलेला मोबाईल नंबर दिसत असेल तर तो नंबर निवडून This is not my number हा पर्याय निवडून Report यावर क्लिक करा.

६) Report केल्यावर आपल्याला Refernce नंबर जपून ठेवा.


खालील  Click Here  बटनावर क्लिक करून आपल्या नावावर रजिस्टर सिम कार्ड आपण जाणून घेऊ शकता.



 

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم