राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी प्रश्नसंच २०२१
NAS EXAM 2021 Question Bank
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी अर्थात NAS चाचणी 12 नोव्हेंबर 2021 रोजी होणार आहे. सदर चाचणी यावर्षी 3 री, 5 वी, 8 वी व 10 वी या वर्गातील विद्यार्थ्यांची Random पद्धतीने शाळा निवडून होणार आहे. राष्ट्रीय स्तरावर प्रत्येक राज्याची शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तराची माहिती घेणे, कोणत्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक क्षमता संपादणूक स्तर किती प्रमाणात कमी जास्त आहे हे ठरविणे हा या चाचणीचा उद्देश आहे.
🎯 इयत्ता 3 री व 5 वी साठी भाषा, गणित व पर्यावरण शास्त्र (environment science) या तीन घटकावर आधारित एकूण 45 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे (वेळ 60 मिनीट)
🎯 इयत्ता 8 वी साठी भाषा, गणित, पर्यावरण शास्त्र (environment science) व सामाजिक शास्त्र (social science) या चार घटकावर आधारित एकूण 60 प्रश्नांची एकच चाचणी होणार आहे. (वेळ 120 मिनीट)
🎯चाचणीसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम नसून सर्व प्रश्न इयत्तानिहाय अभ्यासक्रमातील क्षमतावर आधारित असणार आहेत.
🎯 सदर चाचणीत प्रश्नांचे स्वरूप आपणास कळावे या हेतूने केंद्र खानापूर चित्ता ता.जि.हिंगोली वतीने इयत्ता निहाय प्रश्नपेढी बनविण्यात आल्या आहेत त्याचा आपण वापर केल्यास प्रश्नांचे स्वरूप आपणास समजण्यास मदत होईल.
🎯 खालील इयत्तेच्या नावावर क्लिक करून आपण इयत्ता निहाय प्रश्नपेढी Download करून सराव करा.