बालदिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
( लहान गट )
Baldin Rajyastariy Prashnamanjusha
( Lahan Gat )
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात 'बालदिन' म्हणून साजरा केला जातो. पंडित नेहरुंना लहान मुले फार आवडायची हे देखील त्यामागचे एक कारण आहे. नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. लहान मुलेसुद्धा त्यांना 'चाचा नेहरू' म्हणायची. प्रत्येक शाळेत बालदिन साजरा केला जातो. यानिमित्ताने शाळेत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.जवाहरलाल नेहरू यांच्यावर भाषणे, लहान मुलांसाठी काही शैक्षणिक तर काही मनोरंजक गोष्टी केल्या जातात. या बालदिनाचे औचित्य साधून आम्ही आपणासाठी घेऊन आलोत बालदिनानिमित्त सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा.
ज्यामुळे आपल्याला बालदिन साजरा केल्याचा आनंद तर मिळणारच शिवाय आपल्या ज्ञानात भर पडण्यास देखील मदत होईल. यामध्ये विविध विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.
चला तर बालमित्रांनो ही टेस्ट सोडवून आपण आपले सामान्य ज्ञान वाढवूयातच व सोबत आकर्षक प्रमाणपत्र देखील मिळवूयात..
(सर्वांना प्रमाणपत्र आपल्या ईमेल आय.डी.वर १ डिसेंबर २०२१ रोजी प्राप्त होईल.)