विरामचिन्हे इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती मराठी /viramchinhe std-5th scholarship Marathi

 विरामचिन्हे 



आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, वाचन करतो, तेव्हा आपल्याला मधूनमधून थांबावे लागते.  या थांबण्याला 'विराम' असे म्हणतात.  

बोलण्यातील आणि वाचण्यातील विराम   निरनिराळ्या चिन्हांनी दाखवले जातात.  त्या चिन्हांना 'विरामचिन्हे' म्हणतात.   

विरामचिन्हांनमुळे   वाक्य कोठे  सुरु   झाले, वाक्य कोठे  संपते,  प्रश्न कोठे आहे, उद्गार कोठे आहे,  वाक्यात कोठे व किती थांबावे अशा विविध  गोष्टी कळतात. म्हणून   विरामचिन्हांना  लेखनात खूप महत्व आहे. 

तर अशा  चिन्हांचा वापर  कोठे व केव्हा करावा हे समजण्यासाठी   आपल्याला विरामचिन्हे अभ्यासने  गरजेचे आहे.

१) पूर्णविराम (.)

  • वाक्य पूर्ण झाले हे समजण्यासाठी या चिन्हाचा वापर करतात.
  • उदा.   मी दररोज व्यायाम करतो.
२) अर्धविराम (;)

  • दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडतात,  तेव्हा वापरतात. 
  • उदा. राधा हुशार आहे;पण ती अभ्यास करत नाही.
  • मी  मंदिरात जाते; तोवर तू वाचन कर.
३) स्वल्पविराम (,) 

  • एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास   स्वल्पविराम    वापरतात.
  • हाक / संबोधनवाचक   शब्दापुढे स्वल्पविराम   वापरतात.
  • उदा.  आमच्या शेतात आंबा, चिकू,  फणस  हि फळझाडे आहेत.
  • मुलांनो,  इकडे लक्ष द्या.
४) अपूर्ण विराम (:)
  • वाक्याच्या शेवटी एखाद्या बाबीचा तपशील द्यावयाचा  असल्यास अपूर्ण विरामाचा उपयोग करतात.
  • माणसाच्या मुलभूत गरजा  पुढीलप्रमाणेलं आहेत:  अन्न, वस्त्र, निवारा 
  • पुढील क्रमांकाचे विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले:   ७, ९, १२,२८, ५१  
५) प्रश्नचिन्ह (?)
  • वाक्यात जर प्रश्न विचारला असेल तर,  वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात.
  • तू कुठे गेली होतीस?
  • तुम्ही गावाला केव्हा जाणार आहात ?
६) उद्गारचिन्ह (!)
  • वाक्यात उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी   उद्गारचिन्ह वापरतात.
  • उत्कट भावना जसे की  आनंद, दुःख ,  भीती, आश्चर्य  इत्यादी 
  • उदा. अरेरे! तो चार गुणांसाठी नापास झाला.
  • केवढा मोठा धबधबा हा !
७) अवतरणचिन्ह  
           एकेरी अवतरण ( '  ' )
  • वाक्यात एखा द्या शब्दावर जोर द्यायचा झाल्यास   एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.
  • उदा. कोल्हापूरला 'राधानगरी' असेही म्हणतात. 
  • शिवाजी महाराजांचा जन्म 'शिवनेरी' किल्ल्यावर झाला.
          दुहेरी अवतरण ( " " )
  • बोलणाऱ्याच्या   तोंडचे शब्द दाखवण्याकरिता   दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतात.
  • उदा. कमला म्हणाली ,"उद्या मी कामावर येणार नाही ."
  • बाबा म्हणाले," आपण यावर्षी उन्हाळ्यात महाबळेश्वरला  जाऊ."
८) संयोगचिन्ह ( - )
  • दोन शब्द  जोडण्यासाठी वापरतात.
  • ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास   संयोगचिन्ह वापरतात.
  • उदा. शालेय-शिक्षण,  बहिण-भाऊ 
९) अपसारण ( - )
  • वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसारण वापरतात.
  • उदा.   तो तेथे आला, पण -
१०) काकपद ( ^ )
  • लिखान  करताना एखादा राहिलेला  शब्द लिहीण्यासाठीची खून 



3 تعليقات

Thanks

إرسال تعليق
أحدث أقدم