वचन इयत्ता- पाचवी शिष्यवृत्ती मराठी -vachan std-5th scholarsip marathi

 वचन 




'नामाच्या ठिकाणी  संख्या सुचविण्याचा जो धर्म  असतो , त्याला वचन असे  म्हणतात.' मराठी भाषेत वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोन प्रकार पडतात. अनेकवचनालाच बहुवचन असे म्हणतात.

१) एकवचन - 
  • जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्याचे एकवचन असते.
  • जसे - पुस्तक या नामावरून एकाच पुस्तकाचा बोध होतो.
  • एकवचनी सर्वनामे - मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण. 
 
२) अनेकवचन- 
  • जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याचे अनेकवचन असते. 
  • जसे - पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकाचा बोध होतो.
  • अनेकवचनी सर्वनामे - आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या. 
वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم