वचन
'नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो , त्याला वचन असे म्हणतात.' मराठी भाषेत वचनाचे एकवचन व अनेकवचन असे दोन प्रकार पडतात. अनेकवचनालाच बहुवचन असे म्हणतात.
१) एकवचन -
- जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो, तेव्हा त्याचे एकवचन असते.
- जसे - पुस्तक या नामावरून एकाच पुस्तकाचा बोध होतो.
- एकवचनी सर्वनामे - मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोण.
२) अनेकवचन-
- जेव्हा नामावरून अनेक वस्तूंचा बोध होतो, तेव्हा त्याचे अनेकवचन असते.
- जसे - पुस्तके या नामावरून अनेक पुस्तकाचा बोध होतो.
- अनेकवचनी सर्वनामे - आम्ही, तुम्ही, ते, त्या, ती, जे, ह्या, त्या.
वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.