संचमान्यता - Sanchmanyata 2021-22

 संचमान्यता 2021/22
Sanchmanyata 2021 /22




मा.शिक्षण संचालक साहेब यांचे संचमान्यतेबाबत  पत्र दि.०८/०९/२०२१  त्या पत्रातील आशय


   संचमान्यता 2021/22 Sanchmanyata 2021/22 पूर्ण  करण्यायासाठी  राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अद्ययावत करण्याचे काम संबंधित शाळांच्या व्यवस्थापनांनी पूर्ण करणेबाबत संदर्भाधीन पत्रान्वये कळविण्यात आले होते.
मा. अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण यांनी दिनांक ०८/०९/२०२१ रोजीच्या व्हिसीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील इ. १ ली ते १२ वी मधील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे काम दिनांक ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावे. यापुढील संचमान्यता केवळ आधार नोंदणी झालेल्या (Biometric असो किंवा नसो) विद्यार्थ्यांच्या पटसंख्या आधारे करण्यात येईल. त्यामुळे, जर विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदणी करणे अपूर्ण राहिले तर कमी दिसणाऱ्या पटसंख्येमुळे शिक्षकांची पदे संचमान्यतेत कमी उपलब्ध होतील. सदर सूचना तातडीने आपल्या अधिनस्त सर्व शाळा व्यवस्थापक / मुख्याध्यापक यांच्या निदर्शनास आणून त्याप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी.



मा.शिक्षण संचालक यांचे पत्र दि.०८/०९/२०२१





संचमान्यता 2021/22 संदर्भात शाळांनी स्टुडंट पोर्टल वर करावयाची कामे


१) विद्यार्थी प्रमोशन


संचमान्यता 2021/22 Sanchmanyata 2021/22 पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन आपले प्रमोशन चे काम पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे.चुकून एखाद्या वर्गाचे प्रमोशन राहिले असल्यास संचमान्यता करताना अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून प्रमोशन तात्काळ पूर्ण करावे.


आपल्या शाळेचा Promotion (प्रमोशन) रिपोर्ट खालील पद्धतीने पाहू शकता.

१) सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन Login (लॉगिन) करणे.


२)त्यानंतर Report  या टॅब वर क्लिक करावे.


३) त्यानंतर Promotion (प्रमोशन) टॅब ला क्लिक करा.


४) आपल्या समोर नवीन Window ओपन होईल त्यातील Academic year मधूूून 2020-21 to 2021-22 हे वर्ष  निवडा व त्याच्या बाजूच्या स्टॅंडर्ड (Standard) टॅब वरून All हा पर्याय निवडा आपल्याला आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाचा प्रमोशन रिपोर्ट दिसेल त्यातील पेंडिंग विद्यार्थी आपण पाहू शकता.


२) नवीन विद्यार्थी नोंदणी
संचमान्यता 2021/22 Sanchmanyata 2021/22 पूर्ण करण्यासाठी स्टुडंट पोर्टल वर जाऊन यावर्षी आपल्या शाळेत पहिली मध्ये नवीन विद्यार्थी दाखल झाले असल्यास त्याची नोंदणी पूर्ण करून घ्यावी.


३) विद्यार्थी ट्रान्सफर 
संचमान्यता 2021/22 Sanchmanyata 2021/22 पूर्ण करण्यासाठी स्टुडंट पोर्टल वर  जाऊन आपल्या शाळेतील विद्यार्थी नवीन शाळेत दाखल झाले असल्यास त्या शाळेला आपल्या शाळेला Request पाठवायला सांगून approve करणे. जेणेकरून तो विद्यार्थी त्या शाळेत जाईल.
आपल्या शाळेत दुसऱ्या शाळेतून नवीन विद्यार्थी दाखल झाल्यास त्या शाळेला Request पाठवणे व समोरच्या शाळेला ती Request approve करण्यास सांगा.कारण पाठवलेली Request वेळेत स्वीकारली नाही तर ती BEO लॉगिन ला जाते व आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात.त्यामुळे आपल्या शाळेतील Attach Approval  व  Transfer Approval  च्या Request आल्या असतील तर खात्री करून Approval करा.


४) आधार नोंदणी
संचमान्यता 2021/22 Sanchmanyata 2021/22 पूर्ण करण्यासाठी स्टुडंट पोर्टल वर जाऊन आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थ्यांचे आधार नोंदणी करण्यात आली नाही त्या सर्व मुलांचे आधार नोंदणी करून घ्यावी.कारण यापुढे संचमान्यता आधार नोंदनिवरूनच ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यावरूनच आपल्या शाळेतील शिक्षकांची पदे ठरवली जातील.


आपल्या  शाळेचा आधार रिपोर्ट खालील पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो.


१) सर्वप्रथम स्टुडंट पोर्टल वर जाऊन Login (लॉगिन) करणे.


२)त्यानंतर Report  या टॅब वर क्लिक करावे.


३) त्यानंतर Aadhar Status (आधार स्टेटस) टॅब ला क्लिक करा.


४) आपल्या समोर नवीन Window ओपन होईल त्यातील Udise नंबर वर क्लिक करा आपणास आपल्या शाळेतील एकूण विद्यार्थी, आधार नोंदणी झालेले विद्यार्थी व आधार नोंदणी न झालेले विद्यार्थी आपल्याला दिसून येतील.

स्टुडंट पोर्टल वर जाण्यासाठी क्लिक करा


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم