इयत्ता - ५ वी
विषय - मराठी
ऑनलाईन टेस्ट क्र. १
१. माय मराठी
(May Marathi)
माय मराठी ! तुझिया पायी तनमनधन मी वाहियले, तुझिया नामी, तुझिया धामी अखंड रंगुनि राहियले.
कष्टामधली तुझीच गोडी चाखायाची मज आई, मला आवडे तुझा विसावा, तुझीच निर्भर अंगाई.
तुझे झरे अन् तुझी पाखरे, वास तुझा जनलोक तुझा, हवाहवासा मला वाटतो राग तुझा, संतोष तुझा.
माय मराठी ! तुझिया अंकी लोळण घेते, बागडते, तसेच अलगत तब आभाळी भरारणे मज आवडते.
तुझे चालणे, तुझे बोलणे, दाखव मजला रीत तुझी, जे ओठी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी.
तुझियासाठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची, अर्थ साजरा, गंध लाजरा, नवलपरी पण रंगांची. ,
माय मराठी ! तुझियासाठी बात होउनी जळते मी, क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी.
- संजीवनी मराठे
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.
Fgg
ردحذف919067392425
ردحذفसंग्राम शहाजी गोरे
ردحذف