इयत्ता - ७ वी विषय - गणित ( घटक - पायथागोरसचा सिद्धांत/Pythagoras Theorem )

विषय - गणित
पायथागोरसचा सिद्धांत 

पायथागोरसचा सिद्धांत हा भूमितीतील एक खूप उपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो.
 

 
या सिद्धांतानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो . या सिद्धांताचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहित असतील  तर तिसरी बाजू काढता येते .  
        काटकोनासमोरील बाजूस कर्ण असे म्हणतात . वरील आकृतीत BC हा त्रिकोणाचा कर्ण आहे तर  AC  आणि AB  या त्रिकोणाच्या दोन बाजू आहेत .  बाजू AC ला  त्रिकोणाचा पाया तर बाजू AB ला त्रिकोणाची उंची असेही म्हणता येईल . 
           चला तर विद्यार्थी मित्रांनो हा घटक अभ्यासा व खालील चाचणी सोडवून तुम्हाला हा घटक समजला का हे तपासून पहा .....!!


Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم