पिलूदर्शक शब्द
माणसांच्या लहान मुलांना ( पिल्लांना ) जसे 'बाळ' म्हणतात; त्याप्रमाणे निरनिराळ्या प्राण्यांच्या पिल्लांसाठी निरनिराळे शब्द वापरले जातात.
उदा.
कुत्र्याचे - पिल्लू
माणसाचे - बाळ, लेकरू
शेळीचे - करडू
गाईचे - वासरू
मांजराचे - पिल्लू
सिंहाचा - छावा
गाढवाचे - शिंगरू
मेंढीचे - कोकरू
हरणाचे - पाडस , शावक
घोड्याचे- शिंगरू
म्हशीचे - रेडकू
वाघाचा - बच्चा, बछडा
पक्ष्याचे - पिल्लू
चला तर विद्यार्थी मित्रांनो वरील शब्द अभ्यासून झाले असतील तर खाली दिलेली चाचणी सोडवून शब्द बरोबर येत आहेत का हे तपासुयात ............