Parts Of Tree ( झाडाचे अवयव )
"झाडे लावा झाडे जगवा" हा सुविचार आपल्या सगळ्यांना माहिती असेलच. झाडे हे आपल्या जीवनाचे सार आहेत. झाडाशिवाय पृथ्वीवरील जीवनाची कल्पना अशक्य आहे. ते पृथ्वीवरील अमूल्य संपत्तीसारखे आहेत. वृक्षामुळेच माणसाला त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संसाधने मिळतात. झाडे नसतील तर पर्यावरणाचा समतोल बिघडेल, पाऊस पडणार नाही आणि सर्वत्र विनाश होईल. मानवाला झाडाचे खूप फायदे होतात. झाडे आपल्याला निवारा आणि सावली देतात. झाडे हे औषधाचा एक महत्वाचा स्त्रोत आहेत. झाडे पर्यावरणातील हवा शुद्ध करतात. झाडे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि त्या बदल्यात ते मानवाला श्वसनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवतात. झाडांपासून कागद बनवला जातो. घराच्या बांधकामात आणि फर्निचरसाठी लाकडाचा वापर केला जातो. झाडाला फळ, फूल, पान, फांद्या, मूळ, खोड असे निरनिराळे अवयव असतात आणि हे सर्व अवयव मिळून एक बहारदार वृक्ष निर्माण होतो.
तर विद्यार्थी मित्रांनो अशा या उपयोगी झाडाच्या अवयवांची इंग्रजी नावे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग खाली दिलेली चाचणी सोडवून आपण ती नावे अभ्यासूयात.....!
!
Nice
ردحذفD152618
ردحذفAena