क्रियापद
'वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात.' क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही, तो वाक्यातील मुख्य शब्द असतो. म्हणून क्रियापदाला मुख्य पद असे म्हणतात, तर वाक्यातील इतर शब्दांना उपपदे असे म्हणतात.
पुढील वाक्ये वाचा आणि ठळक शब्दांकडे नीट लक्ष द्या:
१) मी दुध पितो.
२) मी रोज धावतो.
३) मी सफरचंद खातो.
वरील वाक्यातील ठळक शब्दांमधून कोणती ना कोणती तरी क्रिया स्पष्ट होते.
उदा. १) पितो - पिण्याची क्रिया
२) धावतो - धावण्याची क्रिया
३) खातो - खाण्याची क्रिया
'पितो, धावतो, खातो' हे क्रिया दर्शविणारे शब्द आहेत आणि ते वाक्याचा अर्थही पूर्ण करतात आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. वरील वाक्यांतील पितो, धावतो, खातो हि क्रियापदे आहेत.
बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते; परंतु काही वाक्यात क्रियापद मध्येही येऊ शकते.
पुढील दोन वाक्ये लक्षात घ्या:
१) आता कोठे मला धड्याचा अर्थ कळत आहे. ( या वाक्यात क्रियापद शेवटी आहे.)
२) सापडली एकदाची माझी पिशवी. ( या वाक्यात क्रियापद सुरुवातीला आहे.)
क्रियापदाची काही उदाहरणे:
१) सकाळी नियमित व्यायाम करावा.
२) सूर्य पुर्वीकडे उगवत असतो.
३) विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला.
४) आजी मंदिरात जाऊन आली.
५) आज दिवसभर सारखे गडगडते.
६) गावी जाताना वडगावजवळ उजाडले.
७) शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात.
८) त्या मनोहारी दृश्यावर माझे डोळे स्थिरावले.
९) मंत्र्यांची गाडी थेट वस्तीवर येऊन थडकली.
१०) ताईने पत्र लिहून पाठविले.
चला तर विद्यार्थी मित्रांनो वरील घटक आपण अभ्यासला असेलच तर आता तो आपल्याला किती समजला हे खाली दिलेली टेस्ट सोडवून तपासूयात......
Thanks 🙏😊😊📝📝
ردحذفआम्ही सर्वजण तुमचे आभारी आहोत.
ردحذف