०३ .माऊस
माऊस हा इंग्रजी शब्द आहे. माऊस म्हणजे मराठीत उंदीर. आपण गणपतीला विद्येची देवता मानतो. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे. आधुनिक काळात संगणक हा ज्ञान मिळवण्यासाठी मोठा उपयोगी ठरला आहे. माऊस हा त्याचाच एक भाग आहे. माऊसच्या शोधामुळे संगणक वापरणे खूप सोपे झाले आहे. माऊसचा शोध ‘डग्लस एन्गलबर्ट’ यांनी सन १९६४ मध्ये लावला. त्यांनी तयार केलेला माऊस लाकडी आवरण व धातूची दोन चाके असलेला होता. त्याचा आकार उंदराप्रमाणे असल्यामुळे त्याला ‘माऊस’ असे म्हटले जाऊ लागले. या अभूतपूर्व शोधाबद्दल त्यांना पाच लक्ष डॉलर्सचा पुरस्कार देण्यात आला. सध्याच्या काळात अतिशय आधुनिक रुपात माऊस तयार झालेला आहे.
प्रश्न:
१. संगणक वापरणे कशामुळे सुलभ झाले?
२.'माऊस' चा शोध कोणी लावला?
३.विद्येची देवता म्हणून आपण कोणाला मानतो?
03. Mouse
Mouse is an English word. Mouse means rat in Marathi. We consider Ganapati as the deity of knowledge. The rat is Ganapati's vehicle. In modern times, computers have become very useful for gaining knowledge. The mouse is a part of it. The invention of the mouse has made computers much easier to use. The mouse was invented by Douglas Engelbert in 1964. The mouse they made had a wooden cover and two metal wheels. It was called a mouse because it was shaped like a rat. He was awarded five million dollars for this unprecedented discovery. Nowadays, the mouse is very modern.
Question:
1. What makes using a computer easier?
2. Who invented the 'mouse'?
3. Who do we consider as the deity of knowledge?