०२ .गडगडाट आणि कडकडाट
पावसाळ्यात ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट अनेक वेळा अनुभवायला मिळतो. या दोन्ही घटनांत प्रचंड मोठा ध्वनी तयार होतो. या प्रचंड आवाजाने कानांना धोका निर्माण होऊ शकतो. बहिरेपणा येण्याची शक्यता असते. वीज कोसळणे किंवा पडणे हे सुद्धा घडते. वीज जेथे पडेल तेथील प्राणी किंवा वनस्पती नष्ट होतात. जमिनीवर खड्डा पडू शकतो. आपल्यावर वीज पडण्याचे वेगवेगळे परिणामही आढळून येतात. स्मृतीभ्रंश, वेगवेगळे आभास, घाबरणे असे त्रास होऊ शकतात.यासाठी ढगांचा गडगडाट आणि विजेचा कडकडाट होत असताना स्वतःला जपायला हवे. गंमत म्हणूनही अशा वेळी उघड्यावर जाऊ नये. सुरक्षित आसरा घ्यावा. उघड्यावर किंवा झाडाखाली बसू नये. घराच्या दारे खिडक्या बंद करण्यानेही घरात जाणवणाऱ्या आवाजाची तीव्रता कमी होते.
प्रश्न:
१. ढगांचा गडगडाट कोणत्या ऋतूत जाणवतो?
२.विजेचा कडकडाट होत असताना आपण कोणती काळजी घ्यावी?
३.वीज ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी काय परिणाम होतात?