महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

 महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर


केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे देण्यात येणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाले.यावर्षी राज्यातील उस्मानाबाद आणि गडचिरोली जिल्ह्यातील दोन शिक्षकांना हे पुरस्कार जाहीर झाले असून 5 सप्टेंबर रोजी हे पुरस्कार संबंधितांना प्रदान केले जाणार आहेत.



दोन्ही शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड यांनी केले ट्विट करून अभिनंदन...


"देशभरातुन एकूण ४४ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाला असून सर्वांचे अभिनंदन!त्यात २ महाराष्ट्राच्या सुपुत्रांचा समावेश आहे,ही बाब खरोखरंच अभिमानास्पद आहे.अशाच प्रतिभावान शिक्षकांमुळे महाराष्ट्राची नवी पिढी घडेल आणि राज्याचे, देशाचे नावलौकिक करेल,याची मला खात्री आहे. 

राज्यातील जि.प.शाळांत अध्यापन करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिक्षक श्री.उमेश रघुनाथ खोसे (@umeshkhose) आणि गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक श्री. शेख खुर्शीद कुतबुद्दीन यांना केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घोषित 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!"


उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जगदंबा नगर उमरगा येथील तंत्रस्नेही शिक्षक उमेश खोसे आणि गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असराल्ली तालुका सिरोंचा येथील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख यांचा यामध्ये समावेश आहे. आज केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील आदेश जारी केले आहे. देशातील 44 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश आहे.

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم