अपूर्णांक /Apurnank /Fraction
ज्या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येत नाहीत, त्यास अपूर्णांक संख्या म्हणतात.
अपूर्णांक संख्या या अंश आणि छेद स्वरुपात लिहिल्या जातात. अपूर्णांकाचा अभ्यास म्हणजे सर्वच अंक पूर्ण नाहीत हे समजावून घेणे. या पूर्ण अंकांच्या दरम्यान काही अंक आहेत , अर्थातच ते अपूर्ण अंक आहेत, म्हणून त्या अपूर्ण अंकांना अपूर्णांक म्हणतात. घरातील संभाषणात आपण अर्धी भाकरी , अर्धे बिस्कीट , अर्धे कलिंगड चार जणांनी मिळून खाल्ले असा उल्लेख करत असतो. शिवाय प्रवीणला निबंधात दहापैकी सहा गुण मिळाले असा उल्लेख देखील येतो. तर ते सर्व संभाषण गणिताच्या भाषेत लिहायचं झाल्यास ,आपल्याला ते अपूर्णांकात लिहावे लागेल.
उदा.
1.प्रवीणला निबंधात दहापैकी सहा गुण मिळाले. = 6/10
2. अर्धे बिस्कीट = 1/2
3. एका भाकरीचा पाव भाग = 1/ 4