अनुरागने मला जिंकले- राजेश वाघ सर बुलढाणा

🌻माझा आजचा हृदयस्पर्शीअनुभव🌻
    
"अनुरागने मला जिंकले"

   आज शिक्षक दिनानिमित्त शाळेत स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला...संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनीच केले..
यादिवशी10 विचे विद्यार्थीशिक्षक इयत्ता 5 ते 10 विच्या वर्गांना शिकवतात..सगळं निट सुरु होतं..
अचानक एक 5 विचा अपंग व गतिमंद मुलगा अनुराग माझ्याकडे आला अन माझ्या हाताला धरून त्याच्या बोबड्या स्वरात आग्रहाने मला म्हणाला, सर मला 10 व्या वर्गाला शिकवायचे..त्याच्याकडे पाहून इतर लोक हसत होते.. (त्याला निट बोलता येत नाही,अडखळतो) त्याच्या व्यंगामुळे टर उडवत होते..
पण तो मुलगा माझा हात सोडत नव्हता.प्रचंड आत्मविश्वासने 'मला तुमच्यासारखे 10 विला शिकवायचे' म्हणत होता..मीही त्याला म्हंटलं शिकव मग.तर तो म्हंटला तुम्ही चला..त्याला मी तिथे उभा असायला हवा होतो..
तो प्रचंड विश्वसाने 10व्या वर्गात उभा राहीला..अन शिकवू लागला, वीचारु लागला :
10 चा वर्ग सांगा..
शाळेला इंग्रजीत काय म्हणतात ..
आपल्याला उजेड कोण देतो...
हे तो त्याच्या बोबड्या बोलीत विचारत होता, सांगत होता अगदी तल्लीन होवून..अन गम्मत म्हणून मी आमच्या सहकारी मॅडमना आवाज दिला..सर्व विद्यार्थी,शिक्षक,अन प्राचार्या मॅडम या सर्वांच्या उपस्थितीत तो शिकवू लागला..माझ्याकडे पाहू लागला..जणू त्याला पावतीच् हवी होती ,शाबासकी हवी होती..सगळे त्याच्याकडे पहात होते..तो माझ्याकडे पहात होता अन माझ्या डोळ्यांच्या कडा मात्र कधी ओल्या झाल्या मला कळाले सुद्धा नाही...
ह्रदय गदगद झाले..मायेचा पाझर ओसंडून वाहत असलेला मी अनुभवत होतो..मी त्याच्याबद्दल बोलायला उभा राहिलो तर लगेच 'थांबा सर, अजून मला शिकवायचं तुम्ही खाली बसा' असा आदेशच फर्मावला अनुरागनं..विद्यार्थी, शिक्षक अन सर्वांनाच हा आश्चर्याचा सुखद धक्काच होता..
त्याचं शिकवून झाल्यावर प्राचार्या मॅडम अन सर्वांनीच त्याचं भरभरुन कौतूक केलं....
मित्रहो..मला अनेक पुरस्कार मिळाले, अगदी विशेष वेतनवाढ, तालुका ,जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...पण आज 5 विच्या अनुरागने (गतिमंद) "माझ्यासारखे" शिकवायचे म्हणून 10 विला पूर्ण आत्मविश्वासाने शिकवून दिलेली गुरुदक्षिणा ही माझ्यासाठी माझ्या सेवाकाळातील सर्वोच्च ..या पुरस्काराचे मोल मला जगात कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक..
आज मग सर्व औपचारिकता बाजूला ठेवत अनुरागमध्ये जीवंत झालेल्या शिक्षकाचा सन्मान अन सत्कार करुन कार्यक्रमाची सांगता झाली..
पण ह्रदय पाझरताना मुलांमध्ये बालिश खेळ खेळत असलेला अनुराग व त्याच्यातील शिक्षक मला खुणावत होता..प्रेरणा देत होता...
चला तर मग आपण सर्वजन मिळून अशाच एखाद्या अनुरागला आत्मविश्वासाचं बळ देवून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाला बळकटी देवूया..
....राजेश वाघ,
....जिल्हा परिषद हायस्कूल, बुलडाणा...
05/09/2015

Thanks

إرسال تعليق (0)
أحدث أقدم