नवोदय परीक्षा पेपर क्र. २ Navoday Exam Practice Paper No. 1 विषय - मानसिक क्षमता चाचणी घटक - गटात न बसणारी आकृती

 

नवोदय परीक्षा पेपर क्र. २

  Navoday Exam Practice Paper No. 1

 विषय - मानसिक क्षमता चाचणी

घटक - गटात न बसणारी आकृती



ही चाचणी अशाब्दिक असते याचाच अर्थ या चाचणीमध्ये केवळ चित्र व आकृत्या असतात. भाषेचा कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये तसेच मुलांच्या सुप्त गुण वा मानसिक क्षमतांचे मापन करणे या चाचणी मागील उद्देश आहे.

स्वरूप :

1. या परीक्षेत केवळ आकृतीच्या स्वरूपातील 40 प्रश्न विचारले जातात व यासाठी एकूण 50 गुण असतात. एकूण 10 मुख्य घटक असतात व प्रत्येक घटकामध्ये 4 प्रश्न असतात. प्रति प्रश्नास 1.25 गुण असतात.

2. प्रत्येक प्रश्नांमध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती (किंवा प्रश्नांकृतींची मालिका वा संच) दिलेली असते व उजव्या बाजूस चार उत्तर आकृत्या दिलेल्या असतात. प्रश्नाकृतीचा विचार करून अचूक उत्तर आकृती शोधणे अपेक्षीत असते. संभाव्य उत्तरांच्या चार आकृत्यांखाली A, B, C, D ही इंग्रजी अक्षरे लिहलेली असतात, त्यापैकी अचूक उत्तर आकृत्यांच्या खालील इंग्रजी अक्षर स्वतंत्र मिळणाऱ्या उत्तर पत्रिकेतील संबंधित प्रश्नाच्या समोरील चार गोलांपैकी त्या अक्षराचेच गोल रंगवायचे असते.

3. या विभागातील प्रश्न सोडविण्यासाठी 60 मिनिटांचा कालावधी मिळतो.

4. मानसिक क्षमता चाचणी मध्ये खालील 10 घटकावर प्रश्न विचारले जातात.

1. गटात न बसणारी आकृती

2. नमुना पूर्ण (आकृती पूर्ण करणे)

3. विश्लेषण (आकृत्यांमधील समान संबंध शोधणे) 6.

4. दर्पण प्रतिमा (आकृतीचे प्रतिबिंब शोधणे ) 8.

5. आकृती कल्पना (तुकडे जोडून बनणारी आकृती शोधणे)

6. आकृती जुळवणे (हुबेहुब आकृती ठरवणे)

7. श्रुखंला पूर्ण आकृत्यांचा क्रम पूर्ण करणे)

8.भूमितीय (अपूर्ण) आवृती पूर्ण करणे

9. कागदी घड्या उलगडणे

10. लपलेली प्रश्न आकृती शोधणे.

Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post