महाराष्ट्र: बारावीचा निकाल आज दुपारी २ वाजता जाहीर होणार आहे.
mahahsscboard.in वर निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2023 ची घोषणा केली जाईल.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी - मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि.२५ मे २०२३ रोजी दु.२:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर,कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर आज दुपारी २ नंतर उपलब्ध होतील.
शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, यंदाचा राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.
मुंबईचा 88.13% तर कोकणचा सर्वाधिक 96.01% लागला आहे.
कोणत्या विभागाचा किती निकाल?
कोकण विभाग - सर्वाधिक 96.01 टक्के
मुंबई विभाग - सर्वात कमी 88.13 टक्के
पुणे विभाग - 93.34 टक्के
नागपूर विभाग - 90.35 टक्के
औरंगाबाद विभाग - 91.85टक्के
कोल्हापूर विभाग - 93.28 टक्के
अमरावती विभाग - 92.75 टक्के
नाशिक विभाग - 91.66 टक्के
लातूर विभाग - 90.37 टक्के
मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.73 टक्के तर मुलांचा निकाल 89.14 टक्के लागला आहे. म्हणजेच मुलींचा निकाल मुलांपेक्षा 4.59 टक्के जास्त लागला आहे.
23 विषयांचा निकाल 100 टक्के
154 विषयांपैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. बारावीची परीक्षा एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
निकाल कसा पाहाल ?
( 12 VI NIKAL KASA PAHAL?)
यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने एकूण ७ वेबसाईट दिलेल्या आहेत.
(महत्वाचे: निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आईचे नाव टाकायचे आहेत.)HSC RESULT 2023
विद्यार्थी खालील Result बटनावर क्लिक आपला निकाल पाहू शकतात:⤵️
सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी शुभेच्छा..!
१)
२)३)
५)
६)
SMS द्वारे कसा पहाणार निकाल?
SMS द्वारे निकाल मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना मेसेज बॉक्समध्ये जाऊन आपला सीट नंबर टाकून 57766 या क्रमांकावर सेंड करावा लागणार आहे. यानंतर त्याच मोबाईल नंबरवर तुम्हाला तुमचा निकाल पाहता येईल.