NMMS EXAM 2022-23 SELECTION LIST

 NMMS EXAM 2022-23 SELECTION LIST



क दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२२-२३ इ.८ वी साठी परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२२ निवडयादीबाबत.


सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यामधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा हेतू आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती इ. ९ वी ते १२ वी पर्यंत (चार वर्षांसाठी) मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १०००/- आहे (वार्षिक रु. १२,०००/-).

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची ( NMMS) विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी दिनांक १०.०२.२०२३ रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना / पालकांना शाळेमार्फत जात, दिव्यांगत्व, जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास दि. १७.०२.२०२३ पर्यंत परिषदेकडे ऑनलाईन पाठविणेबाबत सूचना देण्यात आलेल्या होत्या. विद्यार्थ्यांनी/पालकांनी शाळेमार्फत पाठविलेल्या दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी गुरुवार दिनांक २७.०४.२०१३ रोजी जाहीर करण्यात येत आहे.

दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी १९७१७० विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा MHRD नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्याथ्र्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्याथ्य संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दि. २७.०४.२०२३ रोजी पासून पाहता येईल.

> सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.

> विद्यार्थ्यांचे गुणपत्रक यथावकाश शाळा लॉगीनवर देण्यात येईल.

> शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.




जिल्हावार व संवर्ग निहाय निवड यादी पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा. ⤵️




2 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post