5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म कसा भरावा?
How to fill scholarship exam form 2023?
How to fill scholarship exam form standard 5th & 8 th?
पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा-२०२३ (Scholarship exam - 2023 ) ही रविवार दि.१२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणार असून त्यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. सदर फॉर्म भरताना शाळा नोंदणी कशी करावी? आवश्यक माहिती काय लागणार आहे? शाळा शुल्क किती? विद्यार्थी परीक्षा शुल्क किती ? फोटो साईज कमी कशी करावी? फॉर्म कसा भरावा ? इ. आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.
ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याचे वेळापत्रक
शाळा नोंदणी (School Registration)
सुरुवातीला संपूर्ण माहिती जाणून घ्या. त्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरून आपण शाळा नोंदणी (School Registration ) करून घेऊ शकता.
UDISE सांकेतांक -
● या मुद्दयापुढील चौकटीत आपल्या शाळेचा 11 अंकी UDISE सांकेतांक टाईप करून Enter बटन प्रेस करावे.
● त्यानंतर SCHOOL NAME या रकान्यात आपल्या शाळेचे नाव दिसेल. सदर नाव आपल्या शाळेचे असल्यास Is this your school name ? या रकान्यातील Yes बटनावर क्लिक करावे अन्यथा No. बटनावर क्लिक करावे.
शाळेचे पूर्ण नाव
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले नाव आपोआप (By Default) येईल, शाळा माहिती प्रपत्रात शाळेच्या नावात काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
शाळा व्यवस्थापन प्रकार
● या मुद्द्यापुढील चौकटीच्या ड्रॉप डाऊन लिस्ट मधील अचूक पर्याय निवडा. (ड्रॉप डाऊन लिस्ट जिल्हा परिषद, महानगरपालिका, राज्य शासन, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत खाजगी मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी मान्यताप्राप्त विनाअनुदानित, खाजगी मान्यताप्राप्त कायम विनाअनुदानित मान्यताप्राप्त स्वयं अर्थसहाय्यित कटकमंडळ व केंद्र शासन )
शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम
आपल्या शाळेत जो अभ्यासक्रम शिकविला जातो. तो पर्याय अचूकपणे निवडा.
● एकापेक्षा जास्त अभ्यासक्रम शाळेत शिकविले जात असतील तर जेवढे पर्याय लागू आहेत तेवढे सर्व पर्याय निवडावेत.
● येथे निवडलेला / निवडलेलेच अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठी उपलब्ध होतील.
● महत्वाचे:
केवळ महाराष्ट्र शासनाचा (Mscert) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील विद्यार्थी गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.
• CBSE / ICSE व इतर अभ्यासक्रमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात नाही.
• ऑनलाईन आवेदनपत्रात चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांवर राहील.
शाळा माध्यम
• या मुद्दयाच्या ड्रॉप डाऊनमध्ये उपलब्ध असलेल्या पंधरा माध्यमांपैकी (मूळ व सेमी इंग्रजी माध्यमांसह) शाळेस लागू असलेले माध्यम निवडा.
● एकापेक्षा अधिक माध्यमातून शिक्षण दिले जात असेल तर जेवढया माध्यमातून शाळेत शिक्षण दिले जात आहे तेवढया सर्व माध्यमांच्या पर्यायांची अचूकपणे निवड करावी.
● येथे निवडलेले / निवडलेली माध्यमेच विद्यार्थ्याच्या ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.
शाळेचा प्रकार -
● आपली शाळा 'आश्रमशाळा' असल्यास ड्रॉप डाऊनमधील पहिल्या तीन पर्यायांमधून योग्य तो पर्याय
निवडावा.
• आपली शाळा कोणत्याही प्रकारची आश्रमशाळा नसल्यास 'आश्रमशाळा व्यतिरिक्त इतर शाळा' हा शेवटचा पर्याय निवडावा.
क्षेत्र -
या मुद्द्याच्या ड्रॉप डाऊनमधून शाळेच्या क्षेत्राची अचूक निवड करावी.
१) ग्रामीण (Rural)
२) शहरी (Urban)
• लक्षात ठेवा ग्रामीण व शहरी क्षेत्रासाठी वेगवेगळे शासनमान्य शिष्यवृत्ती संच आहेत. चुकीचे क्षेत्र निवडल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील. अशा मुख्याध्यापकांविरुध्द शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.
शाळेचा ईमेल आयडी -
● शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमेंटमध्ये टाईप करावा. • त्यानंतर Confirm School Email Id या रकान्यामध्ये शाळेचा ईमेल आयडी इंग्रजी स्मॉल लेटर्समध्ये व अचूक फॉरमॅटमध्ये पुन्हा टाईप करावा.
● येथे नोंदविलेल्या ईमेल आयडीवर आपणास Username व Password पाठविण्यात येईल.
शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का ?
या मुद्द्यापुढील होय / नाही पैकी योग्य पर्याय निवडावा.
शाळेचा पूर्ण पत्ता -
• स्थानिक पत्ता
• घर नंबर, सर्व्हे नंबर, रस्ता, वॉर्ड, पेठ, क्षेत्र व जवळची खूण चौक, स्टेशन, स्टैंड, हॉस्पीटल, इत्यादीच्या जवळ अशी माहिती या मुद्दयासमोरील चौकटीत शाळेचा पूर्ण पत्ता इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.
( येथे शाळेचे नाव टाईप करण्याची आवश्यकता नाही.)
गाव / शहर
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेले शाळेचे गाव/ शहर आपोआप (By Default) येईल.
● त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
• या मुद्द्याखालील चौकटीत पोस्ट (पोस्टाचे ठिकाण व गाव) इंग्रजी कॅपिटल लेटर्स मध्ये टाईप करा.
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा जिल्हा, तहसील आपोआप (By Default) येईल.
• या मुद्यापुढील चौकटीत आपल्या शाळेचे UDISE सिस्टममध्ये नमूद केलेला शाळेचा पिनकोड आपोआप (By Default) येईल.
• दूरध्वनी क्रमांक
• STD कोडसह शाळेचा दूरध्वनी क्रमांक नमूद करावा. शाळेस दूरध्वनी नसल्यास मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक टाकावा.
शाळा संलग्नता शुल्क
• हे शुल्क दरवर्षी शाळेने भरणे आवश्यक आहे. NTS किंवा NMMS परीक्षेसाठी शाळा संलग्नता शुल्क भरले असले तरीही शिष्यवृत्ती परीक्षेकरीता शाळा संलग्नता शुल्क रु. 200/- भरणे अनिवार्य राहील.
मुख्याध्यापकाची माहिती -
● या मुद्दयामधील पाच वेगवेगळया चौकटीत अनुक्रमे मुख्याध्यापकांचे आडनाव, प्रथम नाव, मधले नाव, मोबाईल क्रमांक (१० अंकी), ईमेल आयडी अचूकपणे टाईप करा.
( येथे नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर आपणास Username व Password पाठविण्यात येईल.)
उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुन्हा एकदा तपासून माहिती अचूक असल्याची खात्री करुनच Submit बटनावर क्लिक करावे.
शाळा माहिती प्रपत्र ( School Profile)
● शाळा नोंदणी मधील Submit बटनावर क्लिक केल्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रात नमुद केलेल्या शाळेच्या ईमेल आयडी व मुख्याध्यापकाच्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेल्या Username व Password च्या आधारे लॉगीन करावे.
• त्यानंतर शाळा नोंदणी प्रपत्रामध्ये नमुद केलेली सर्व माहिती आपणास दिसेल. त्यामध्ये काही दुरुस्ती असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.
● संपर्कासाठी वैकल्पिक मोबाईल क्रमांक अथवा दुरध्वनी क्रमांक नमुद करावा.
● मुख्याध्यापकांचा फोटो व स्वाक्षरी शाळा माहिती प्रपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे.
पांढऱ्या कागदावर पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.
> फोटो व स्वाक्षरी JPG, JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावी.
> फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.
● उपरोक्तनुसार सर्व माहिती भरून झाल्यानंतर Submit & Confirm बटनावर Click करावे.
● Submit & Confirm बटनावर Click केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
● उपरोक्त मुद्द्यांबाबतच्या पुराव्याची कागदपत्रे शाळेत जतन करून ठेवावीत.
शाळा नोंदणी करण्याकरिता खालील चित्रावर क्लिक करा.
ऑनलाईन फॉर्म भरण्यासंबंधी सविस्तर सूचना खालीलप्रमाणे आहेत.
(ऑनलाईन फॉर्म मधील सर्व माहिती विद्यार्थी जनरल रजिस्टर मधील नोंदणीप्रमाणे अचूक भरण्यात यावी.)
१) सर्वसाधारण सूचना :
● शाळा नोंदणी प्रपत्र भरल्यानंतर आपणास विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होतील.
● लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std 5th (PUP) या बटनावर क्लिक करावे.
• त्यानंतर आपणास Registration व Payment हे दोन पर्याय दिसतील.
• Registration या बटनावर क्लिक केल्यानंतर आपणास ऑनलाईन आवेदनपत्र उपलब्ध होईल.
(२) विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक (Student Application Number)
• प्रत्येक आवेदनपत्रास स्वतंत्ररीत्या विद्यार्थी आवेदनपत्र क्रमांक सिस्टिमव्दारे जनरेट होईल.
३) फोटो (Photo) -
• प्रत्येक विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी ऑनलाईन आवेदनपत्रात अपलोड करणे अनिवार्य आहे. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून जतन करून ठेवावेत.
● विद्यार्थ्याचा फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपध्दती ८.५ से.मी. X ४.५ से. मी. आकाराच्या पांढऱ्या कागदावर रंगीत फोटो चिकटवून त्याखाली काळया शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरचा फोटो व स्वाक्षरी स्कॅन करावी.
● फोटो व स्वाक्षरी .JPG, JPEG किंवा PNG या फॉरमॅटमध्ये सेव्ह करावा.
• फोटो व स्वाक्षरीच्या फाईलची साईज १०० kb पेक्षा जास्त नसावी.
4) विद्यार्थ्याचे नाव (Student Name)
●आडनाव (Last Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
● प्रथम नाव (First Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
● वडीलांचे नाव (Father's Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
● आईचे नाव (Mother's Name) इंग्रजी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करा.
● इंग्रजी कॅपिटल लेटर्स शिवाय इतर कोणतीही लिपी (देवनागरी - मराठी / हिंदी, इ.) वापरु नये,
5) लिंग (Gender)
• ड्रॉप डाऊनमधून MALE / FEMALE या पैकी अचूक पर्याय निवडा.
6) दिव्यांग आहे का? (Are you Differently abled ?) -
• ड्रॉप डाऊनमधून आहे/ नाही पैकी अचूक पर्याय निवडा.
●आहे पर्याय निवडल्यास लेखनिक आवश्यक आहे का ? (Do you need a writer for Exam?)
असा प्रश्न स्क्रीनवर उपलब्ध होईल,
• लेखनिक हवा असल्यास आहे (Yes) हा पर्याय निवडा, नको असल्यास नाही (No) हा पर्याय निवडा.
• लेखनिकास आपल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची परीक्षेपूर्वी किमान 8 दिवस अगोदर मान्यता घ्यावी.
7) जन्म दिनांक (Date of Birth) -
● शाळेच्या जनरल रजिस्टर/ दाखलखारीज रजिस्टरमधील रेकॉर्डप्रमाणे Day Year या स्वरुपात संबंधित रकान्यात विद्यार्थ्यांची जन्मतारीख नॉदवा. (ड्रॉप डाऊन लिस्टमधून दिवस, महिना, वर्ष निवडा.)
कमाल वयोमर्यादा -
> विद्यार्थ्याचे वय परिक्षेस बसण्याच्या कमाल विहित वयोमर्यादेपेक्षा जास्त असल्यास
स्क्रीनवर विद्यार्थ्याचे वय विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त आहे. तरीही विद्यार्थ्यास परीक्षेस प्रविष्ठ होता येईल परंतु त्यास शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही.' असा संदेश दिसून येईल.
> विहित कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वय असलेल्या विद्याथ्र्यांना आवेदनपत्र भरता येईल तसेच परीक्षेस प्रविष्ट होता येईल. मात्र अशा विद्यार्थ्यांना परीक्षेत कटऑफ इतके अथवा कट ऑफ पेक्षा अधिक गुण मिळाले तरीही त्यांना शिष्यवृत्ती अर्हताधारक घोषित केले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
8) महाराष्ट्राचा रहिवासी आहे का? (Are you domicile of Maharashtra?) -
• ड्रॉप डाऊनमधून आहे/ नाही पैकी अचूक पर्याय निवडा.
9) आधार कार्ड क्रमांक (Aadhaar No.)
● विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले असल्यास त्यावरील 12 अंकी आधार कार्ड क्रमांक टाईप करावा. मात्र विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक असणे अनिवार्य नाही.
10) आधार नोंदणी क्रमांक (Aadhaar Enrollment No.)
विद्यार्थ्यास आधार कार्ड मिळाले नसल्यास आधार नोंदणी रिसीटवरील 28 अंकी आधार एन्टॉलमेंट क्रमांक टाईप करावा, मात्र विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार एन्टॉलमेंट क्रमांक असणे अनिवार्य नाही.
11) आरक्षणाचा प्रवर्ग (Reservation Category)
• शाळेच्या जनरल रजिस्टर / दाखलखारीज रजिस्टरमधील नोंदीप्रमाणे जातीनुसार विद्यार्थ्याच्या आरक्षणाचा प्रवर्ग ड्रॉपडाऊन लिस्टमधून अचूकपणे निवडा (ड्रॉप डाऊन लिस्ट खुला (GEN), अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), विमुक्त जाती अ(VJ-A), भटक्या जमाती ब (NT-B), भटक्या जमाती क (NTC), भटक्या जमाती ड (NT-D), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागास प्रवर्ग (SBC)
विशेष सूचना
• महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणान्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VIA, NT-B, NT-C. NTD या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE. ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.
• कोणताही अभ्यासक्रम राबविणान्या शाळांतील उर्वरित SBC, OBC. OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क पुर्ण भरावे लागेल, चुकीचा आरक्षण प्रवर्ग नोंदविल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
• महाराष्ट्र शासनाच्या (MSCERT) अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांतील मागासवर्गीय (SC, ST, VJ-A, NT-B, NTC, NTD) या प्रवर्गातील विद्यार्थ्याचा H आणि I शिष्यवृत्ती संचासाठी गुणवत्तेनुसार विचार केला जातो. म्हणून आरक्षण प्रवर्ग अचूक नोंदविणे आवश्यक आहे.
12) परीक्षेचे माध्यम (Medium for Examination ) -
● शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी निवडलेली माध्यमे ऑनलाईन आवेदनपत्रात उपलब्ध होतील.
● उपलब्ध असलेल्या माध्यमांपैकी विद्यार्थी ज्या माध्यमातून परीक्षेस प्रविष्ट होणार आहे ते माध्यम निवडा.
●सेमी इंग्रजी माध्यम निवडल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर क्र. | मधील गणित या विषयाची व पेपर क्र. 2 मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम आणि इंग्रजी माध्यम अशा दोन्हीही माध्यमांतून मिळेल व त्यानुसार गुणदान करण्यात येईल.
13) विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम (Student's Curriculum)
● शाळा माहिती प्रपत्र भरतेवेळी शाळेने जो/जे अभ्यासक्रम निवडला ले होता/होते. अभ्यासक्रम स्क्रीनवर उपलब्ध होईल होतील.
● त्यापैकी विद्यार्थी सध्या शाळेत शिकत असलेला अभ्यासक्रम अचूकपणे निवडा.
विशेष सूचना
• महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात (MSCERT) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याचा गुणवत्तेनुसार शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.
चुकीचा अभ्यासक्रम नोंदविल्यामुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीस अपात्र ठरल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.
14) वडीलांचे / पालकांचे वार्षिक उत्पन्न (Father's / Parent's Annual Income)
• वार्षिक उत्पन्न रु.20,000/- (वीस हजार रुपये) पर्यंत किंवा रु.20,000/- ( वीस हजार रुपये पेक्षा जास्त यापैकी अचूक पर्याय निवडा)
● संबंधित विद्यार्थ्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसल्यास वार्षिक उत्पन्न रु.20,000/- (वीस हजार रुपये) पेक्षा कमी हा पर्याय निवडू नये.
● संबंधित विद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.20,000/- ( बीस हजार रुपये) पर्यंत असल्यास सक्षम अधिकाऱ्यांचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करून ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावे.
• विदर्भातील 11 जिल्ह्यांकरीता राखीव असलेल्या F G H व I या शिष्यवृत्ती संचासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.20,000/- ( वीस हजार रुपये) पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेनुसार विचार केला जाईल.
वडील /पालक भूमिहीन शेतमजूर आहे का? (इयत्ता 8 वी साठी)
●होय / नाही अचूक पर्याय निवडा.
15) पालकाचा मोबाईल क्रमांक (Parent's Mobile No.)
• या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध असल्यास नमुद करावा. मात्र अनिवार्य असणार नाही.
16) पालकाचा ईमेल आय.डी. (Parent's Email ID.) -
• या रकान्यामध्ये विद्यार्थ्याच्या पालकांचा ईमेल आय. डी. उपलब्ध असल्यास नमूद करावा. मात्र अनिवार्य असणार नाही.
17) आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (Are you a tribal from Tribal Sub Plan (T.S.P.) area?) (इयत्ता 5 वी साठी)
● हा पर्याय आदिवासी विद्यानिकेतन प्रवेशाबाबत आहे.
● विद्यार्थी शासनाने जाहीर केलेल्या आदिवासी क्षेत्रातील आदिवासी (S.T.) असल्यास होय हा पर्याय निवडावा, आदिवासी क्षेत्रातील नसल्यास नाही हा पर्याय निवडावा.
18) विद्यानिकेतन प्रवेश (Admission To Public School) फक्त 5 वी करिता
● पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसमवेत शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. पुढीलपैकी आवश्यक / लागू असलेल्या विद्यानिकेतन प्रवेशाबाबत योग्य ते पर्याय निवडा.
18. 1) शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ? -
प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडावा, नको असल्यास नाही पर्याय निवडावा.
18.2) आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ? -
प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडावा, नको असल्यास नाही पर्याय निवडा.
18.3) विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे का ? -
प्रवेश हवा असल्यास आहे पर्याय निवडा, नको असल्यास नाही पर्याय निवडा.
19) शुल्क (Fee)
यावर्षीपासून परीक्षा शुल्क व प्रवेश शुल्क खालीलप्रमाणे असणार आहेत.
• ऑनलाईन आवेदनपत्रात प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क एकुण शुल्क आपोआप गणले जाऊन संबंधित चौकटीत नोंदविले जाईल.
विशेष सूचना
• प्रवेश शुल्क रु.50/- सर्व विद्यार्थ्यांना (मागासवर्गीय बिगर मागासवर्गीय व दिव्यांग) यांना पण लागू आहे.
● परीक्षा शुल्क -
• महाराष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या (MSCERT) शाळेतील SC, ST, VJ-A, NT-B. NT-C, NT-D या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली असून, ही सवलत CBSE, ICSE व इतर अभ्यासक्रमांच्या शाळातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू नाही.
•सर्व अभ्यासक्रमांच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यासाठी सुध्दा परीक्षा शुल्कामध्ये सवलत देण्यात आलेली आहे.
• उर्वरित SBC, OBC, OPEN या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागेल.
२०) विद्यार्थ्याच्या बँक खात्याची माहिती
• यामध्ये विद्यार्थ्यांच्याच बँक खात्याची माहिती भरावी, त्यामध्ये विद्यार्थ्याच्या बँक खाते क्रमांक IFSC CODE, बँकेचे नाव व शाखेचे नाव ही माहिती भरावी.
● विद्यार्थ्याचे बँक खाते नसल्यास रकाना रिकामा सोडावा.
मात्र विद्यार्थ्याचे आवेदनपत्र भरण्यासाठी बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही.
21) महत्त्वाचे-
• उपरोक्तनुसार ऑनलाईन आवेदनपत्रातील सर्व माहिती भरल्यानंतर Save & Preview या बटनावर क्लिक करावे. आपणास विद्यार्थ्याचे ऑनलाईन भरलेले आवेदनपत्र स्क्रिनवर दिसेल.
• ऑनलाईन आवेदनपत्रात काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करुन दुरुस्ती करता येईल.
• ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करून Submit या बटनावर क्लिक करावे.
● Dashboard मध्ये आपल्या शाळेच्या ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी Pending Payment Student List मध्ये दिसेल.
22) Fee Payment -
● डॅशबोर्डवरील डाव्या बाजूस असलेल्या Std. 5th (PUP) व Std. 8th (PSS) यामधील Fee Payment या बटनावर क्लिक करावे.
● क्लिक केल्यानंतर आपणास Pending Payment Student List मध्ये आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांची एकत्रित यादी दिसेल. सदर यादीतील एखाद्या विद्यार्थ्याचे शुल्क आपणास भरावयाचे नसल्यास त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरील चेकबॉक्स वर क्लिक करुन Deselect करावे.
• त्यानंतर स्क्रीनवरील उजव्या बाजूस असणाऱ्या Proceed to Payment या बटनावर क्लिक करावे, क्लिक केल्यानंतर Payment Gateway चे पेज स्क्रिनवर दिसेल. त्यावरील CONFIRM & PAY या बटनावर क्लिक केल्यानंतर योग्य त्या पर्यायाची निवड करुन आवश्यक माहिती भरावी व Make Payment या बटनावर क्लिक करुन प्रक्रिया पूर्ण करावी.
• त्यानंतर आपणास भरलेल्या शुल्काची ऑनलाईन रिसीट प्राप्त होईल ती आपल्या दप्तरी जतन करून ठेवावी.
● ऑनलाईन आवेदनपत्र भरलेल्या विद्याथ्यांचे शुल्क भरल्यानंतर त्या विद्यार्थ्यांची नावे Successfully Registered Student List मध्ये दिसतील व सदर विद्यार्थ्यांच्या Registration ची प्रक्रिया पुर्ण होईल.
• Successfully Registered Student List मध्ये दिसणारे विद्यार्थीच परीक्षेस पात्र ठरतील.
• परीक्षा शुल्क भरल्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात कोणतीही दुरुस्ती करता येणार नाही.
ऑनलाईन आवेदन पत्रे भरताना फोटो साईज कमी करण्यासाठी विविध app प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे त्यापैकी खाली दिलेल्या लिंकवरून सहज पद्धतीने व वापरास सुलभ अँप आपण Install करू शकता.
शाळा नोंदणी करण्याकरिता खालील चित्रावर क्लिक करा.
अशापद्धतीने आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2023 चे ऑनलाईन फॉर्म भरू शकता.