इयत्ता - सहावी
विषय - मराठी
ऑनलाईन टेस्ट क्र. ३
डॉ. कलाम यांचे बालपण
(Doctor Kalam Yanche Balpan)
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम - (१९३१ - २०१५) अणुशास्त्रज्ञ भारताचे माजी राष्ट्रपती मनस्वी वृक्षप्रेमी, हाडाचे शिक्षक आणि बालकप्रेमी. 'विग्ज ऑफ फायर','इंडिया २०२० ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम' आणि 'इग्नायटेड माइंड्स इत्यादी पुस्तके प्रसिद्ध. 'पद्मभूषण', 'पद्मविभूषण' आणि 'भारतरत्न' पुरस्कारांनी सन्मानित डॉ. कलाम यांच्या 'विंग्ज ऑफ फायर' या आत्मचरित्राचा माधुरी शानभाग यांनी 'अग्निपंख' या नावाने अनुवादित केलेल्या पुस्तकातून खालील प्रसंग घेतले आहेत.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिकण्याची जिद्द. त्यांच्या जीवनावर आई-वडिलांचा पडलेला प्रभाव आणि बहीण-भाऊ यांचा सहवास यांतून डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या बालपणीच्या जडणघडणीचे चित्रण या पाठातून केलेले आहे.
आपण ही टेस्ट सोडवून आपल्याला हा घटक कितपत समजला हे जाणून घेऊयात.