लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त प्रश्नमंजुषा
''स्वराज्य हा माझा जन्मसिध्द अधिकार आहे
आणि तो मी मिळवणारच "
अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेता म्हणुन ख्यातनाम आहेत. बाळ गंगाधर टिळक भारतीय क्रांतीकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकिल व भारतीय स्वातंत्र्य सेनानी देखील होते.
भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेता लोकमान्य टिळक ! ब्रिटीश अधिकारी त्यांना "भारतीय अशांततेचे जनक म्हणत " यामुळेच त्यांना 'लोकमान्य" ही पदवी देण्यात आली. (लोकमान्य.... लोकांनी मान्य केलेला )
टिळकांनी कारागृहात रामायण, महाभारत, तुकाराम, ज्ञानेश्वरी, दासबोध आदी ग्रंथांचे वाचन केले व 'गीतारहस्य' हा ग्रंथ केवळ चार महिन्यांत पूर्ण केला.
मंडाले येथून सुटल्यावर 'पुनश्च हरी ओम्' ची गर्जना करून टिळकांनी कार्य सुरू केले. लखनौ करार घडवून हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवून दिले. अशा जहाल विचारसरणीच्या देशभक्ताची 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथील सरदारगृहात प्राणजेत मावळली.
आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. यामध्ये टिळकांच्या जीवनावर आधारित प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसेल तरी ते माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.