इयत्ता - सहावी
विषय - मराठी
ऑनलाईन टेस्ट क्र. 2
सायकल म्हणते, मी आहे ना !
(Saykal mhante, me aahe na!)
आपण याठिकाणी सायकल बद्दल थोडक्यात व महत्वाची माहिती पाहू व त्यानंतर खाली दिलेली टेस्ट सोडवू.
- सायकलचा शोध 1690 साली फ्रान्स देशातील एम. डी. सिव्हर्क या शास्त्रज्ञानी लावला.
- सायकलला गती यावी यासाठी एच. जे. लॉसन यांनी सायकलच्या पेडलला साखळीची दंततबकडी बसवली.
- सायकल ला अधिक गतिशील करण्यासाठी जॉन बॉईड डनलॉप यांनी १८८७ साली रबरी टायर शोधून काढले.
- सायकलची किंमत माफक असते व अपघाताची शक्यता एकदम कमी असते.
- दूध, भाजीपाला, औषधी आणणे अशी छोटी-मोठी कामे सायकलने अगदी पटापट होतात.
- सायकल साठी चालक परवाना काढायची गरज नसते.
- सायकल मुळे इंधनाची बचत होते, तसेच वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण देखील टाळता येते.
- सायकलमुळे व्यायाम होतो त्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते तसेच सायकल चालवल्याने पायांचे स्नायू बळकट होतात.
- एकंदरीत सायकल आपल्यासाठी वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रीय दृष्टीने फार महत्वाची आहे.
आपण ही टेस्ट सोडवून आपल्याला हा घटक कितपत समजला हे जाणून घेऊयात.