जागतिक महिला दिनानिमित्त प्रश्नमंजुषा
Jagtik Mahila Din Prashnamanjusha
8 मार्च रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जातो. जगातील विविध प्रदेशांमध्ये महिलांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम व्यक्त करून हा दिवस महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक कामगिरीचे स्मरण म्हणून साजरा केला जातो. आज अनेक क्षेत्रात महिलांनी जागतिक पातळीवर आपल कर्तुत्व सिद्ध केल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ, मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या सावित्रीबाई फुले अशा सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन.
ज्याला स्त्री आई म्हणून कळली ,तो जिजाऊचा शिवबा झाला |
ज्याला स्त्री बहिण म्हणून कळली
तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला |
ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळलीतो सीतेचा राम झाला|
अशाच कर्तबगार स्त्रियांच्या कार्याला स्मरण्यासाठी आम्ही आपणासाठी प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. ही प्रश्नमंजुषा सर्वांसाठी खुली आहे. ही प्रश्नमंजुषा सोडवा ⤵️
#womensdaymh2022
#Internationalwomensday