राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा |Rajmata Jijau Jayanti nimitta Rajyastariy Prashnamanjusha


राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा 

(Rajmata Jijau Jayanti nimitta Rajyastariy Prashnamanjusha )





"मुजरा माझा माता जिजाऊला
ज्यांनी घडविले शूर शिवबाला |  
साक्षात होती ती आई भवानी 
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी"

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. 
जिजाऊंचा स्वराज्याचा संकल्प, लढाऊ बाणा आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची उर्मी यांच्यामुळेच शिवराय घडले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. जिजाऊंनी शिवबाला फक्त जन्मच दिला नाही तर हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी ज्ञान, चातुर्य, पराक्रम, चारित्र अशा अनेक संस्काराचे बाळकडू त्यांनी शिवरायांना दिले. खंबीर नितृत्व, करारी बाणा व धाडसी वृत्ती या गुणवैशिष्टांच्या आधारावर जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या 'प्रेरक' ठरल्या. म्हणूनच म्हणावसे वाटते की--
त्रिवार असावा मानाचा मुजरा, त्या मातेला 
जिने घडविला राजा रयतेचा !
रचली स्वराज्याची गाथा, दैवत असे ती राजमाता!! 
अशाच यशस्वी जीवनासाठी आवश्यक मुल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे या उद्देशाने आम्ही आपणासाठी राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  आयोजित केली आहे. यामध्ये विविध विषयावर आधारित सर्वसमावेशक असे प्रश्न समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळे आपल्या ज्ञानात निश्चितच भर पडेल याची आम्हाला खात्री वाटते. जरी एखाद्या प्रश्नाचे उत्तर आपणास माहिती नसेल तरी त्याची माहिती होऊन आपल्या ज्ञानात भर पडेल.
 सदर स्पर्धा ही तीन गटासाठी असेल. 

#RajmataJijauJayanti2023
#Sanman_Maharashtrachya_Lekincha2023
#Jijau_Jayanti_Prashnmanjusha2023

ला तर बालमित्रांनो, खालील चित्रावर क्लिक करून आपला गट निवडून सामान्य ज्ञानावर आधारित राज्यस्तरीय  प्रश्नमंजुषा सोडवूयात ..















Thanks

Post a Comment (0)
Previous Post Next Post