पाचवी शिष्यवृत्ती
गणित
परिमिती
(Parimiti / Perimeter)
परिमिती - बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय.काही महत्वाची सूत्रे-1) त्रिकोणाची परिमिती = त्रिकोणाच्या तीनही बाजूंच्या लांबींची बेरीज
2) आयताची परिमिती = 2 x लांबी + 2 x रुंदी = 2 (लांबी + रुंदी )
3) चौरसाची परिमिती = 4 x एका बाजूची लांबी
4) बहुभुजाकृतीची परिमिती = बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्य बाजूंच्या लांबींची बेरीज
ही चार सूत्रे वापरून आपण कोणत्याही बंदिस्त आकृतीची परिमिती काढू शकतो.
उदाहरण : दिलेल्या आकृतीची परिमिती किती ?
बहुभुजाकृतीची परिमिती = बहुभुजाकृतीच्या सर्व बाह्य बाजूंच्या लांबींची बेरीज = 7 + 8+ 2 + 8 + 6 = 31 सेमी
वरील घटकाचा अभ्यास करून टेस्ट सोडवल्यास आपल्याला घटक कितपत आत्मसात झाला हे समजण्यास मदत होईल.
शिष्यवृत्ती परीक्षा टेस्ट सोडवताना हे प्रश्न आधी वहीत लिहून घ्या, कच्चे काम करा मगच ऑनलाईन सोडवा तरच आपला योग्य सराव होऊन परीक्षेत यश मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला किती मार्क्स (गुण) मिळाले हे कमेंट करून नक्की सांगा.