लिंग इयत्ता - पाचवी शिष्यवृत्ती मराठी - लिंग (Gender) Std - 5th Scholarship

लिंग     

 

ज्या नामावरून ते पुरुषजातीचे ( नर ) आहे की स्त्रीजातीचे (मादी) आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही हे  आपल्याला कळते; त्याला त्या नामाचे लिंग म्हणतात. 

१) पुल्लिंग :

  • ज्या नामावरून पुरुषजातीचा बोध होतो, ते पुल्लिंग असते.
  • 'तो' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे. 
  • उदा. तो-मुलगा, तो-घोडा, तो-फळा, तो-चिमणा, तो-मृत्यू, तो-चांगुलपणा    
२) स्त्रीलिंग: 
  • ज्या नामावरून स्त्रीजातीचा बोध होतो, ते स्त्रीलिंग असते. 
  • 'ती' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते स्त्रीलिंगी मानावे.
  • उदा. ती-मुलगी,ती-घोडी, ती-फळी, ती-चिमणी, ती-वही  
३) नपुंसकलिंग:
  • ज्या नामावरून पुरुषजातीचा अथवा स्त्रीजातीचा बोध होत नाही ते नपुंसकलिंग असते.
  • 'ते' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते नपुंसक लिंगी मानावे.
  • उदा. ते-मूल, ते- फूल, ते- पुस्तक, ते-वासरू, ते-गवत, ते-धैर्य    

💥 लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे.
💥 अनेकवचनी किंवा आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही ते नाम एकवचनी करूनच त्याचे लिंग ओळखावे.

वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.


6 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post