काळ
वाक्यात दिलेल्या क्रियापादावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.
काळाचे मुख्य तीन प्रकार पडतात -
- वर्तमानकाळ
- भूतकाळ
- भविष्यकाळ
क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ 'वर्तमानकाळ' असतो.
उदा.
- मी अभ्यास करतो.
- मी आंबा खातो.
- आम्ही क्रिकेट खेळतो.
- ती गाणे गाते.
जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला 'भूतकाळ' असे म्हणतात.
उदा.
- गणेश शाळेत गेला.
- तिने गृहपाठ केला.
- मी निबंध लिहिला.
- महाराज शौर्याने लढले.
क्रियापदाच्या रूपावरून एखादी क्रिया हि पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला 'भविष्यकाळ' असे म्हणतात.
उदा.
- पुढच्या आठवड्यात मी औरंगाबादला जाईन.
- आज पाऊस पडेल.
- मी डॉक्टर बनेल.
- ती नाचत जाईल.
सर्वनाम |
वर्तमानकाळ |
भूतकाळ |
भविष्यकाळ |
मी |
नाचतो |
नाचलो |
नाचेल |
आम्ही |
नाचतो |
नाचलो |
नाचू |
तू |
नाचतोस |
नाचलास |
नाचशील |
तुम्ही |
नाचता |
नाचलात |
नाचाल |
तो (राम) |
नाचतो |
नाचला |
नाचेल |
ती (सीता) |
नाचते |
नाचली |
नाचेल |
ते (एकवचन)
(मूल) |
नाचते |
नाचले |
नाचेल |
ते (
अनेकवचन) (मुलगे) |
नाचतात |
नाचले |
नाचतील |
त्या (बाई) |
नाचतात |
नाचल्या |
नाचतील |
ती (अनेकवचन)
(माणसे) |
नाचतात |
नाचली |
नाचतील |
वरील घटक अभ्यासल्यावर तो आपल्याला किती समजला आहे हे तपासून पाहण्यासाठी खाली दिलेली चाचणी सोडवा.