Domestic / Pet Animals online test (पाळीव प्राणी ऑनलाइन टेस्ट )


Domestic / Pet Animals (पाळीव प्राणी)




 मनुष्य आणि प्राणी यांचा संबंध प्राचीन काळापासून आहे. जे प्राणी मनुष्यासाठी उपयोगी आहेत व हिंसक नसून त्यांना आपण सहजपणे पाळू शकतो अशा प्राण्यांना पाळीव प्राणी म्हणतात. कुत्रा, मांजर, गाय, बकरी, घोडा, म्हैस यासारखे प्राणी मनुष्य पाळतो आणि हे प्राणी वेगवेगळ्या कारणासाठी वापरले जातात. जसे कि गाय, म्हैस यांच्यापासून आपल्याला दुध मिळते. तसेच घोडा आणि मेंढी हे पाळीव प्राणी आर्थिक दृष्ट्या खूप फायदेशीर असतात. मेंढी पासून आपल्याला लोकर मिळते तर घोड्याचा वापर प्राचीन काळापासून वस्तूंची ने - आण करण्यासाठी होतो. उंट आणि गाढव यांचा वापर आझे वाहून नेण्यासाठी होतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे आणि घराच्या सुरक्षेसाठी तो पाळला जातो. बैलाचा वापर शेत कामासाठी होतो असे हे पाळीव प्राणी मनुष्यासाठी खूप उपयोगी ठरतात. 

         विद्यार्थी मित्रांनो पाळीव प्राण्यांची मराठी नावे तुम्हाला माहिती असतील तसेच त्यांची इंग्रजी नावे माहिती असणे सुद्धा आवश्यक आहे. चला तर खालील चाचणी सोडून आपण त्यांची इंग्रजी नावे अभ्यासूयात.       

4 Comments

Thanks

Post a Comment
Previous Post Next Post