०५. चित्रकथी
पूर्वी आजच्यासारखी करमणूक किंवा मनोरंजन करणारी साधने नव्हती. लोकही अशिक्षित होते. रात्रीची जेवणं संपवून लोक एकत्र जमायचे, गप्पागोष्टी करायचे. यातूनच चित्रकथीचा जन्म झाला. काही जणांनी कथानकांवर चित्रे काढली त्यांचा संग्रह केला. अशा चित्रांच्या मदतीने त्यांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली. चित्रांवरून गोष्टी सांगण्याच्या या पुरातन कलेला ‘चित्रकथी’ असे म्हणतात. साधारणपणे २५ ते ३० चित्रांमध्ये एक कथा सामावलेली असे. यात प्रमुख गायक कथा गायनातून सादर करी. त्याचे सहकारी कथानाट्य उभारण्यासाठी झांज, वीणा आणि डमरू या वाद्यांचा ताल धरून गोष्ट रंगायला मदत करीत. पूर्वीची गावेही लहान असत. गावागावांत जाऊन चित्रकथी आपले कार्यक्रम सादर करीत. लोकांच्या मनोरंजनाबरोबरच त्याचे प्रबोधन करीत.
प्रश्न:
१.चित्रकथीचा जन्म कसा झाला?
२.साधारणपणे किती चित्रामध्ये एक कथा लपलेली असे?
३.चित्रकथी कशाला म्हणतात?
05. Comics
In the past there were no entertainment or recreational devices like today. People were also uneducated. After dinner, people would gather and chat. From this, Chitrakathi was born. Some took pictures of the stories and collected them. With the help of such pictures, they began to tell stories. This ancient art of telling stories through pictures is called 'Chitrakathi'. Normally 25 to 30 pictures contained one story. The lead singer sang the story. His colleagues helped to color the story by playing the rhythms of Zanj, Veena and Damru. The earlier villages were also small. Going to the villages and presenting his programs. Enlightening the people as well as entertaining them.
Question:
1. How was Chitrakathi born?
2. In how many pictures is a story usually hidden?
3. What is Chitrakathi called?
🙏👍👌👌👌👌👌👌
ReplyDeleteThanks
Delete