०६. एरंडाचे गुऱ्हाळ
ऊसाचा रस काढण्याच्या ठिकाणाला गुऱ्हाळ म्हणतात. उसाचा रस काढण्यासाठी चरक या यंत्राचा वापर केला जातो. पूर्वी सर्रास लाकडी चरक वापरले जात. हल्ली लोखंडी चरक वापरले जातात. उसाचा रस आपल्याला उपयोगी असतो. उसाचा रस आवडीने प्यायला जातो. उसाच्या रसापासून काकवी, गूळ अशी उत्पादने घेतली जातात. एरंड ही वनस्पती कमी पावसाच्या भागात आढळते. एरंडाच्या खोडाचा उसाच्या खोडासारखा रस काढण्यासाठी वापर करता येत नाही. एरंडाचे झाड अन्नासाठी उपयोगी नसते. अशा एरंडाच्या गुऱ्हाळाचा काय उपयोग ? ज्या कामाचा उपयोग नसतो ते काम निरर्थक असते. एखादी व्यक्ती उगीचच काहीही, खूप वेळ बडबडत करत बसते, या बडबडीला काहीच अर्थ नसतो अशा बडबडीला ‘एरंडाचे गुऱ्हाळ’ असे म्हणतात. काही लोकांचे बोलणे एरंडाच्या गुऱ्हाळासारखे असते. अशी माणसे मग दुर्लक्ष करण्यायोग्य होतात.
प्रश्न:
१. उसाचा रस काढण्याच्या ठिकाणाला काय म्हणतात?
२.एरंड ही वनस्पती कोणत्या भागात आढळते?
३.'एरंडाचे गुऱ्हाळ' असे आपण कशास म्हणतो?
06. Castor cattle