🔸पेन्शनचा हक्क मिळवण्याची वेळ आलीय,सावध व्हा ,संघटित व्हा 🔹
📝 ज्ञानदेव नवसरे
समय का पहिया चलता है । ❗
सरकारी कर्मचारी अन्याय सहता है❗
नमस्कार मित्रांनो🙏
आज विविध क्षेत्रातील सरकारी कर्मचारी इमानदारीने काम करत शासनाचा गाडा नेटाने पुढे घेऊन जात असताना सरकारकडूनच वारंवार त्यांची पिळवणूक होत आलेली दिसून येतेय, त्याचे कारण सरकारबरोबरच कर्मचारी सुद्धा आहे.
तुम्ही म्हणाल जर कर्मचारी इमानदारीने काम करतोय मग तो जबाबदार कसा? इमानदारीने काम करण्याबरोबरच आपल्या सुरक्षित भविष्यासाठी संघटित राहायला पाहिजे की ज्याची आज उणीव भासत आहे अन त्याचाच फायदा सरकार अन तत्सम लोक घेत आलेली आहेत ,आत्ताही चालूच आहे कारण त्यांना माहिती आहे सरकारी कर्मचारी आला म्हणजे त्यांच्यात असंघटितपणा आलाच .
या असंघटितपणाचं मातेरे कायमच आपण आपल्याच डोक्यावर फोडत आलेलो आहोत पण संघटित मात्र कधीच होत नाहीत.
आजपर्यंतच्या जगातील कोणत्याही इतिहासातील विजय ऎकले ,पाहिले तर समजून येते की प्रत्येक विजय हा सैनिकांच्या संघटन शक्तीतूनच साकार झाले आहेत.
अाम्हाला पेन्शन तर पाहिजे पण आंदोलन नको,संघटन नको, कसं शक्य आहे? परस्पर होईल ही भावना आमच्यामध्ये जोमाने बळावतेय नव्हे तर कधीच बळावलेली आहे
अात्ताच नव्हे पहिल्यापासूनच त्याचे परिणामही आम्ही भोगतोय ,अन्याय सहन करतोय पण संघटित होऊन जाब मात्र कधीच विचारत नाहीत .
आपण असेच असंघटित राहिलो ,वागलो तर पेन्शनचा विषय तर सोडाच पण आपल्या पोटावर पाय द्यायला सुद्धा सरकार मागेपुढे पाहणार नाही किंवा पाहत नाही ,त्याचा हलकासा प्रत्यय आपल्या महागाई भत्त्याच्या ,बदल्यांच्या बाबतीत पाहतच आहोत तरीही आम्ही कुणाला जाब विचारत नाहीत कारण आम्हाला परस्पर कामे करून घ्यायची सवय लागलीय ना !
ह्या आपल्या परस्पर कामे करून घेण्याच्या फडतूस प्रवृत्तीमुळेच आज अशी परिस्थिती आलीय की ज्यामुळे आम्ही आयुष्यभर नोकरीच्या कामात राब राब राबून देखील निवृत्तीनंतरचे भविष्य अंधारात दिसत आहे .
आपण जोपर्यंत संघटित नाहीत तोपर्यंत अन्यायाचा दगड आपण आपल्याच पायावर टाकून घेणार आहोत याचेही भान राहुद्या.
अहो कधी सावध होणार आहोत आपण ?कधी जागे होणार आहोत आपण?जरा अंगावरच्या एकलेपणाची शाल बाहेर फेकून द्या, संघटनाच्या मंडपात जाऊन बसून तर बघा.एकदा संघटन शक्ती अजमावून तर बघा , एकदा संघटनाांसोबत चालून तर बघा.
एकदा बघाच !
बघा ! काय दिसतयं?
आपले मजबूत संघटन झाले तर जुनी पेन्शन मिळवूच त्याशिवाय अन्यायी सरकारला माणसात तोंड दाखवला सुद्धा जागा ठेवणार नाहीत.
आम्हाला माहिती आहे अशी निवेदने देऊन पेन्शन मिळणार नाही
पण निवेदने देताना जर आपण सर्व संघटित दिसलो तर खुप काही फरक पडणार आहे.
वेळ आलीय संघटित होण्याची,
आपली संघटन शक्ती दाखवण्याची,
संघटन शक्ती अजमावण्याची.
चला तर मग तयारी करूया उद्याच्या मूकमोर्चाची,
चला तयारी करू आपल्यासोबत बांधवांना घेऊन चालायची,
चला विचारू सरकारला आपल्यावरील अन्यायाचा जाब.
उद्या शनिवार दिनांक १९/०९/२०१५. रोजी पेन्शन बचाव कृतीसमिती पेठच्या वतीने
पंचायत समिती पेठ ते तहसील कार्यालय पेठ
असा
भव्य मूकमोर्चा आयोजित केलाय तरी तालुक्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी उद्या उपस्थित राहून संघटन दाखवण्याचे मी पेन्शन बचाव कृतीसमिती पेठच्या वतीने आवाहन करतो.
👬पेन्शन बचाव ॥ टेन्शन हटाव ॥👭
पेन्शनविषयक
इतर लेख आणि कविता वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
http://dnyanvahak.blogspot.in/2015/09/blog-post_16.html
धन्यवाद 🙏
🔶पेन्शन बचाव कृतीसमिती पेठ🔷
ता - पेठ. जि - नाशिक.